Advertisement

धारदार शस्त्राने वार करत 40 वर्षीय तरुणाची हत्या

प्रजापत्र | Sunday, 22/10/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - शहरात वनविभागाच्या कार्यालयासमोर धारदार शस्त्राने वार करत 40 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचां धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला.महादेव मुंडें,रा. भोपळा ता. परळी अस मयत तरुणाच नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 तहसील कार्यालय आणि वनविभागाचे कार्यालय असलेल्या सततच्या वर्दळीच्या भागात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली तसेच परळी शहरातील वाढती गुन्हेगारी खुन, मारामाऱ्या, लुटीचे प्रकार वाढल्याने पोलीस प्रशासन नेमके करतेय काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 

Advertisement

Advertisement