बाबुराव जेधे
वडवणी - आज वडवणी तहसील कार्यालयावर धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तहसील कार्यालय येथे हजारो समाज बांधव उपस्थित राहून शासनाकडे आपली मागणी व्यक्त केली.
गेल्या ७५ वर्षापासून भारतीय राज्यघटनेमध्ये पुष्ठ क्रमांक ३६ वर धनगर ओरान असा समाविष्ट आहे या राज्यातल्या धनगर समाजाची मागणी आहे तात्काळ समाविष्ट असलेल्या एसटी अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी वडवणी तहसील कार्यालयावर भव्य सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी धनगर समाजाने पिवळे झेंडे, ढोल गजे वाजवत तहसील कार्यालय परिसर दुमदुमून टाकला होता.
बातमी शेअर करा