Advertisement

लॉजवर आढळला तरुणाचा मृतदेह

प्रजापत्र | Saturday, 07/10/2023
बातमी शेअर करा

जगन सरवदे 

अंबाजोगाई-येथील एका लॉजवर १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज (दि.७) सायंकाळी ५.३० च्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली.या तरुणाने लॉजच्या रूममध्ये गळफास घेऊन जीवन संपविले आहे.सध्या अंबाजोगाई शहर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. 
           सोमनाथ येडे (रा. सोमनाथ बोरगाव,वय-१९) हा तरुण योगेश्वरी देवीच्या मंदिरानजीक असलेल्या राधा लॉजवर एका मुलीसोबत आला होता.सायंकाळी ५.३० च्या सुमारास लॉजमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेतत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.घटनेनंतर मुलगी फरार झाल्याची माहिती असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनोद घोळवे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.   

 

Advertisement

Advertisement