बीड-वडवणी तालुक्यातील मैंदाजवळ मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका गोडावूनवर छापा मारून कोट्यवधींचा साठा ताब्यात घेतल्याची माहिती आहे.या घटनेने जिल्हयात एकाच खळबळ उडाली असून यामध्ये राजकीय व्यक्तींच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्ह्यात दारूची अवैध विक्री सर्रासपणे सुरु असून बीडच्या राज्य उत्पादन शुल्काने केज तालुक्यातील ठोंबरे वस्तीजवळ छापा मारून काल सव्वाचार लाखांचा माल ताब्यात घेतला होता.त्यानंतर आज (दि.६) मैंदाजवळ एका बंद पडलेल्या शाळेत दारूचा कारखाना सुरु होता.याबाबतची माहिती मुंबईच्या पथकाला मिळाल्यानंतर याठिकाणी छापा मारून दारू तयार करण्याची मशीन आणि साठा असा कोट्यवधींचा माल राज्य उत्पादन शुल्काला हाती लागल्याची माहिती आहे.दरम्यान ही जागा गुटखा प्रकरणात आरोपी असलेल्या आबा मुळेची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या गैरप्रकारात अनेकांची नावे समोर येणार असून याकारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा