अंबाजोगाई - तालुक्यातील आज सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास बहीण-भावाचा एका तळ्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
तालुक्यातील अंबासाखर ते लोखंडी सावरगाव रस्त्याजवळ असलेल्या एका तळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यु झाल्याची घटना आज (दि.५) रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. रोहीत परमेश्वर चव्हाण (वय-१७), आश्विनी लहू जाधव (वय-१२) असे मयतांची नावे आहेत. हे दोघे आज १२ च्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेले असता पाण्यात पाय घसरल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बहीण भावांचे मृतदेह स्वाराती रूग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा