Advertisement

दुचाकी चोरट्यांना रंगेहात पकडले

प्रजापत्र | Tuesday, 03/10/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारूर - धारूर शहरातील कसबा विभागात नागरीकांनी रात्री उशीरा तीन मोटरसायकल चोरट्यांना रंगेहात पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. या मोटरसायकल चोरट्यांना चांगला चोप देण्यात आला. या तिघांवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 

धारूर शहरातील कसबा विभगात शिनगारे गल्लीमध्ये गणेश हरिशचंद्र थोरात यांचे घराच्या गेट मध्ये लावलेल्या मोटरासायकल गेटचे कुलूप तोडून चोरून नेण्यासाठी हे चोर घरात शिरले. गेटचा आवाज आल्यामुळे सदर कुंटूंबीय जागे होऊन बाहेर आले. या मोटरसायकल चोरट्यांनी तिन पैकी दोन मोटर सायकल बाहेर गेटचे बाहेर काढल्या होत्या व तिसरी काढण्याचे तयारीत होते. या मध्ये बुलेट क्र (एम एच ४४- ०५७७), स्पेलंन्डर क्र (एम एच ४४ व्हि १५४०) या बाहेर काढल्या होत्या तर स्पिंलेन्डर क्र. (एम एच २६- जी. ३५५८) हि काढण्याचे तयारीत असताना या मोटरसायकलसह गणेश सुंदरराव बहीरे रा.धारूर, नवनाथ किसन आखाडे रा. बीड, ताबीज ताज पठाण रा.बीड या तिघांना या भागातील नागरीकांनी पकडून चांगलाच चोप दिला व धारूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले. येथील सहायक पोलीस निरीक्षक विजय अटोळे यांनी या आरोपीना तात्काळ ताब्यात घेऊन यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. 

Advertisement

Advertisement