Advertisement

आष्टी तालुक्यात वाळू माफियांचा धुडगूस

प्रजापत्र | Sunday, 20/12/2020
बातमी शेअर करा

तहसीलदारांसमोरच तलाठी,मंडळाधिकाऱ्यांना धक्काबुकी 

आष्टी  : तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली असून शनिवारी (दि.१८) तालुक्यातील टाकळसिंग शिवारात दिवसाढवळ्या कडी नदीच्या पाञातून वाळू उपसा करत असल्याची माहिती तहसिलदार शारदा दळवी यांना समजताच त्यांच्या पथकाने हिंगणी शिवारात धाड मारली असता वाळू माफियांनी मंडळाधिकारी सिंघगवाड व तलाठी पवणे यांना तहसिलदारांसमोर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व घटनास्थळावरून पळ काढला.याप्रकरणी वाळू माफियांच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                 आष्टी तालुक्यातील हिंगणी परिसरात असलेल्या कडी नदीच्या पाञातून शनिवारी (दि.१९) दुपारी तीन वाजता अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती तहसिलदार शारदा दळवी यांना गुप्त माहितीच्या आधारे समजताच स्वत; तहसिलदार शारदा दळवी यांच्यासह टाकळसिंग मंडळधिकारी शिवशंकर सिंघनवाड,मंगरुळ सजाचे तलाठी ए.जी.पवणे,पोखरी सजाचे शरद पाटील व ब्रम्हगांव सजाचे तलाठी आकाश डोहे यासह कर्मचारी व अधिकारी यांनी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी १ जेसीबी व ३ टॅक्टर अनाधिकृृृत वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच त्यातील स्वराज कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर सुखदेव विठ्ठल दळवी (रा.तिखी) याने एक ब्रास वाळूसह पळविला,त्यानंतर त्या ठिकाणी असलेले जाॅनडियर कंपनीचा टॅक्टर व जेसीबी ही पळवून गेला.

                              त्यानंतर आम्ही विना नंबरचाच सोनिलिका कंपनीचा टॅक्टर अडविले त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू होती.आम्ही चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने अक्षय पवार असे सांगितले व मालकाचे नाव शरद अनारसे रा.वाकी असे सांगितले.सदरील टॅक्टर आम्ही आष्टी तहसिल कार्यालयात आणत असतांना आम्हाला टाकळसिंग येथील जगताप वस्ती जवळ दिंगाबर जगताप यांच्या घराजवळ आलो असता हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र.एम.एच.२३ ए.जी. २०८२) ह्या मोटार सायकलवरून शरद खोटे व संदिप भाऊसाहेब कदम रा.दैठणा यांनी आमच्या समावेत वाद घालण्यास सुरूवात करत पवणे तलाठी यांना खाली ओढत धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.तेव्हा मी व तहसिलदार दळवी त्यांच्याकडे पळत गेलो.तलाठी पवणे यांना कदम यांच्या ताब्यातून सोडविले.ही घटना घडत असतांना तर ट्रॅक्टर चालक अक्षय पवार याने एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर पळवून गेला.तसेच अगोदर असलेल्या जाॅनडियर कंपनीच्या ट्रक्टरचा फोटो काढला असता तो ट्रक्टरवरील चालकाचे नाव अक्षय गिताराम काळे असल्याचे समजले.तरी वरील लोकांनी अवैध वाळू उपसा करत असतांना आम्ही कारवाई साठी गेलो असता सरकारी कामात अडथळा निर्माण करून,धक्काबुक्की करून,शिवीगाळ करून,अवैध वाळू भरलेले ट्रक्टर,जेसीबी पळवून नेले असल्याच्या विरुध्द मंडळधिकारी शिवशंकर सिंघनवाड यांच्या फिर्यादी वरून आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

Advertisement

Advertisement