Advertisement

शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा

प्रजापत्र | Wednesday, 27/09/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने नेकनूर पोलीस हद्दीत शेतात लागवड केलेल्या गांजावर केलेल्या बेधडक कारवाईनंतर आता परळी तालुक्यातील ही एका शेतात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

 

 

अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील नंदागौळ येथील आरोपी तुळशीराम केरबा गित्ते यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याच्या माहितीनुसार पोलीसांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन छापा टाकला. यामध्ये 22,792 रु. चे 160 गांजा सदृश ओलसर हिरवट मुळाला लागलेल्या मातीसह इलेक्ट्रीक वजण काट्यावर मोजमाप करता 05 किलो 698 ग्रम वजनाची झाडे आढळून आली.याप्रकरणी सहा.पोलीस निरीक्षक नारायण गित्ते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी.कदम हे करत आहेत. 

Advertisement

Advertisement