Advertisement

12 तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Sunday, 24/09/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२४ (प्रतिनिधी)-अंबाजोगाई व परिसरात गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगणाऱ्या ममदापुर येथील आदित्य काटे या आरोपीच्या अंबाजोगाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडून १२ तलवारी जप्त करण्यात आल्या.पोलिसांच्या या कारवाईबदल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
        लातूर रोड पाण्याची टाकी अंबाजोगाई येथे  आदित्य काटे हा हातात तलवार घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाईचे पथक सदर ठिकाणी जावून अचानक छापा मारला असता आदित्य आनंद काटे (वय-१९ वर्षे रा. ममदापुर ता. अंबाजोगाई) असे त्याचे ताब्यात एक तलवार मिळून आली.विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर,बालक कोळी ग्रामीण पोलीस स्टेशन, चाँद मेंढके पोलीस उपनिरीक्षक पोह गायकवाड, पोह.घोळवे, नागरगोजे, पो.कॉ.व्हावळे, होमगार्ड मुसा शेख यांनी त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने अंबाजोगाई तालुक्यातील राडी व ममदापुर शिवारात लपवून ठेवलेल्या १२ तलवारी किंमत अंदाजे १८ हजार रुपये किंमतीचे काढून दिल्या.याप्रकरणी आदित्यवर 364/23 कलम 4, 25 भारतीय शस्त्र कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement