Advertisement

हातभट्टी दारू विकणाऱ्यावर एमपीडीए

प्रजापत्र | Sunday, 17/09/2023
बातमी शेअर करा

बीड-सध्या गणेशउत्सव तोंडावर आला असून जिल्ह्यात सण शांततेत साजरे व्हावे यासाठी पोलिसांनी कडक पाऊले उचलायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. 
         विजय राजेंद्र काळे (वय-२७,रा.क्रांतीनगर,केज) याच्यावर हातभट्टी दारू तयार करणे,विक्री करणे यासह पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.यातील चार गुन्हे न्यायप्रविष्ट असून एक गुन्ह्याचा तपास सुरु आहे.विजय काळेवर यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसत नसल्याने या आरोपीवर 'एमपीडीए' कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत पाठविण्यात आला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी याला मंजुरी दिल्यानंतर स्थनिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि बाळासाहेब पवार, पोउपनि पाटील, पो. अं. श्रीकांत चौधरी, संतोष गित्ते, बाबासाहेब अंहकारे सर्व पो.स्टे. केज व बीड स्थागुशाचे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, बप्पासाहेब घोडके, संजय जायभाये यांनी केलेली आहे.  

Advertisement

Advertisement