Advertisement

केज तालुक्यात जुगार अड्डयावर धाड

प्रजापत्र | Sunday, 10/09/2023
बातमी शेअर करा

बीड-केज तालुक्यातील टाकळी येथे एका जुगार अड्डयावर धाड मारून पाच जणांना ताब्यात घेत सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल पोलीस अधिक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांनी जप्त केला आहे.अवैध धंद्याविरोधात मुंडे यांनी कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    केज तालुक्यातील टाकळी येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांना मिळाली होती. त्यानुसार आज त्यांनी सहकारी पीएसआय पाटील, पीएसआय सारंग यांच्यासमवेत पत्त्याच्या क्लबवर धाड मारली. यावेळी

बालाजी शिवाजी घुले,अनिल बाळासाहेब घुले,सिद्धेश्वर विनोद घुले,संजीवन सुरज घुले,कानिफनाथ शिवाजी घुले 

या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहा जण फरार झाले आहेत. या कारवाईत २ लाख ३१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement