Advertisement

मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

प्रजापत्र | Saturday, 09/09/2023
बातमी शेअर करा

परळी - मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज (दि.९) मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने नागापूरच्या वाण धरणाच्या पाण्यात उतरून जल आंदोलन केले.  मराठा समाजास आरक्षण द्यावे, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलकावर करणाऱ्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने नागापूरच्या वाण धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. 

 

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे,  आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजास आरक्षण जाहीर न  केल्यास सामूहिक जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा चे सद्स्य अमित घाडगे यांनी यावेळी दिला आहे. 

Advertisement

Advertisement