Advertisement

रोडरॉबरीतील आरोपी अवघ्या तीन तासात जेरबंद

प्रजापत्र | Friday, 01/09/2023
बातमी शेअर करा

 

 

परळी दि.1 (प्रतिनिधी): येथील स्वाभिमान नगर भागातील गोविंद ज्ञानोबा बोचरे (वय 38) यांना 27 ऑगस्ट रोजी रात्री मोंढा भागातून पायी जात असतांना अनोळखी दोन इसमांनी रस्त्यावर मारहाण करून लुटले होते. या प्रकरणात 30 ऑगस्ट रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व त्यांच्या सहकार्‍यांनी अवघ्या तीन तासात आरोपीला जेरबंद केले आहे. त्यांच्या या कारवाईबद्दल परळीमधून कौतूक करण्यात येत आहे.

गोविंद बोचरे यांना विशाल मिलिंद सिरसाठ (वय 18, रा.फुले नगर), शेख खदीर शेख जहीर (वय 23, रा.जुने रेल्वे स्टेशन) या दोघांनी भररस्त्यावर मारहाण करून खिशातील नगदी 7 हजार रुपये व मोबाईल लंपास केला होता. या प्रकरणात 30 ऑगस्ट रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवी सानप, सहायक पोलीस निरीक्षक श्री. दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. बोचरे यांना मारहाण करणारे दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानुसार परळी शहरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता वरील दोन आरोपी सरदार वाईन शॉपपासून फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले. सीसीटीव्हीच्या आधारे या दोन व्यक्तींची ओळख पटल्यानंतर परळी पोलीसांनी अवघ्या तीन तासात दोन्ही आरोपींना जेरबंद केले. यावेळी या आरोपींकडून नगदी 7 हजार, दोन मोबाईल असा 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे, श्री केंद्रे, श्री येलमटे, श्री. भताने, श्री.पांचाळ, श्री.कोलमवाड, श्री.रेडेवाड यांनी केली.

Advertisement

Advertisement