Advertisement

कारमधून देशी दारूचा साठा जप्त

प्रजापत्र | Friday, 01/09/2023
बातमी शेअर करा

बीड-केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे पोलीस अधिक्षक यांच्या पथकाचे प्रमुख असलेल्या गणेश मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धनेगाव फाट्यावर एका कारमधून देशी दारूचा साठा जप्त केला आहे.या कारवाईत ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी (दि.१) करण्यात आली.
        युसूफवडगाव पोलीस ठाण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धनेगावमधील हॉटेल सरकारसमोर इंडिगो कार(एम.एच.१२ ईएम ८१५१) मधून देशी दारूच्या तीन बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. यावेळी कार व इतर दारूसाठा असा ३ लाख १० हजारांचा मुद्देमालजप्त केला असून ही कारवाई पोलीस अधिक्षक यांचे पथक प्रमुख गणेश मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

 

Advertisement

Advertisement