बीड-केज तालुक्यातील मांडगाव फाटा येथील मंदिरात देवदर्शन करून झोपलेल्या प्रवाशांना अज्ञात चोरट्यांनी जबर मारहाण करून लुटल्याची घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी समोर आली होती.याप्रकरणात वर्षभरानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळाल्या आहेत.
मांडगाव फाटावरील महादेव मंदिरात काही प्रवाशी देवदर्शन करून झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करून मोबाईल, नगदी रक्कम व काही वस्तू असा १७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. युसूफवडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र वर्षभरानंतर ही गुन्ह्यातील चोर फरार होते. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना गुप्त माहितीद्वारे मंदिरातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व इतर कर्मचाऱ्यांना वपरगावमध्ये पाठविले. पोलिसांनी यावेळी नवनाथ मधुकर काळे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्याचे साथीदार दीपक बजरंग काळे व सदाशिव बजरंग काळे या दोघांनाही पोलिसांनी नाहोली (ता. केज) येथून जेरबंद केले आहे. तीन ही आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी ममुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह / मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/ अश्विनकुमार सुरवसे, सचिन आंधळे यांनी केलेली आहे.