बीड - एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह आज १२ वाजण्याच्या सुमारास होणार असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि समाजिक कार्यकर्त्यांनी लग्न स्थळी जाऊन बालविवाह रोखला.
बीड तालुक्यातील काटवटवाडी येथे आज दुपारी अल्पवयीन मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील एका २९ वर्षीय मुलासोबत विवाह होणार होता. याची माहिती कळताच तिप्पटवाडीचे ग्रामसेवक रवि घोडके, काटवटवाडी ग्रामसेविका सुनिता मिसाळ, ग्रामीण ठाण्याचे एस. आर. मुंडे. होमगार्ड युनूस शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्वशिल कांबळे यांनी मुहूर्ताच्या आधी जावून सदरील बालविवाह रोखला.
बातमी शेअर करा