Advertisement

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

प्रजापत्र | Monday, 21/08/2023
बातमी शेअर करा

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - अधिक श्रावण मास व त्यानंतर नीचे श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी असा एक अद्भुत संयोग जुळून आल्यामुळे आज परळीतील वैद्यनाथाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे.

 

 

 

आज २१ ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. तसेचा या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष कमी होतो. यंदाची नागपंचमी विशेष  आहे कारण या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील असेल.नागपंचमीचा सण पहिला श्रावणी सोमवारी येत असून मंगळवारी या सणाची सांगता होणार आहे. या खास दिवशी महादेवांसोबत नागाचे देखील पूजन केले जातआहे. सोमवारी भगवान शंकराची विधिवत पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळागौर देखील साजरी केली जाईल. ज्यामुळे नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास अनेक पुण्य फळे प्राप्त होतील असे मानले जाते .त्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर हा शुभ संयोग आला आहे.

Advertisement

Advertisement