Advertisement

एकनाथ शिंदे यांची प्रतिमा लावून अघोरी जादूटोणा

प्रजापत्र | Thursday, 17/12/2020
बातमी शेअर करा

जव्हार : विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे, अटक केलेली इसम हे अस्या अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.
                      अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणारे सुत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.

  हेही वाचा 

Advertisement

Advertisement