Advertisement

सिरसाळ्यात रोखला बाल विवाह

प्रजापत्र | Monday, 07/08/2023
बातमी शेअर करा

परळी दि.७ (प्रतिनिधी)-तालुक्यातील सिरसाळा नजीक रेणुका नगर मोहा रोडलगत एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प केअरला मिळाली. सदरील बालविवाहाची माहिती मिळताच प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तातडीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी यासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात असतानाही बाल विवाहा सारखे प्रकार सुरू आहेत.

       युवा ग्राम विकास मंडळ गेल्या ११ वर्षापासून चाईल्ड लाईन (१०९८) हा प्रकल्प केंद्रीय महिला व बाल विकास यांच्या सहकाऱ्याने चालवत आहे. 0 ते १८ वर्ष वयोगटातील मुला मुलींना २४ तास आपतकालीन सेवा पुरविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मौजे रेणुका नगर मोहा रोड सिरसाळा येथे बालविवाह असल्याबाबत १०९८ वरून माहिती प्राप्त होताच चाईल्ड लाईन सदस्य संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी संबधित ग्रामसेवक सरपंच, अंगणवाडी सेविका, गटविकास अधिकारी, तहसिलदार आणि पोलीस स्टेशन परळी यांना फोनद्वारे संपर्क साधला व होत असलेल्या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली. हा विवाह थांबविण्यासाठी चाईल्ड लाईन सदस्य संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांना माहिती दिली. ग्रामसेवक पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह थांबविण्यात आला.

Advertisement

Advertisement