Advertisement

आष्टीतील शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे

प्रजापत्र | Tuesday, 15/12/2020
बातमी शेअर करा

प्रवीण पोकळे 
आष्टी : घराच्या बाजुला लागुनच असलेल्या शेतात कारखेल बुद्रुक  शिवारातील एका शेतकऱ्यांने गांजाची झाडे लावली आहेत अशी गुप्त माहिती अंभोरा पोलिसाना समजाताच लवाजमासह गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेत १६ किलो आठशे ग्रॅम गांजा छापा टाकून जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अंभोरा पोलीस स्टेशन केलेल्या कारवाई सोमवार दि.१४ डिसेंबर रोजी केली.
                           आष्टी तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथील सचिन साहेबराव जाधव या शेतकऱ्याने घराच्या बाजुलाच लागुन असलेल्या सर्व्हे न.८६
या शेतात गांजाची २ झाडे १२ फूट उंचचे गांजाची झाडे छापा टाकून अंभोरा पोलिसांनी छापा टाकून १६ किलो ८०० ग्रॅम गांजाचे झाडे किंमत १ लाख ६८ हजार  तीनशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या फिर्यादी वरून अंभोरा पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई उपनिरीक्षक राहुल लोखंडे, पो. ना.देवडे,पो. ना.राठोड ,पो. शि.बोडखे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement