Advertisement

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

प्रजापत्र | Saturday, 15/07/2023
बातमी शेअर करा

 

केज - एका भरधाव जीपने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जणांचा जागीच मृत्यू (DEATH) झाला असून सोबतचा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात (ACCIDENT) केज - धारूर रस्त्यावरील सानेगुरुजी निवासी शाळेसमोर शनिवारी ( दि.१५) दुपारी झाला. या अपघातात दुचाकीवरील रामेश्वर सदाशिव घुले ( वय-४५) रा. टाकळी ता. केज हे गंभीर जखमी (INJURED) होऊन मरण पावले. त्यांच्या सोबत असलेले रामकीसन चोले (वय-३०), रा.असोला ता.धारूर  हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement