माजलगाव - तालुक्यातील वारोळा येथील रिधोरी शिवारात एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
संदिपान तौर (वय-३०) रा.वारोळा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदिपान याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. संदिपानच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने वारोळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा