Advertisement

वडवणीत अवघ्या सात मिनिटात एटीएम मशिन पळविली

प्रजापत्र | Wednesday, 05/07/2023
बातमी शेअर करा

 

 

वडवणी -  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्राव्हेट कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी मध्यरात्री पळविली आहे. चोरटयांनी अवघ्या ७ मिनिटात मशीन पळविली. या घटनेन शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर श्वान पथकासह मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टेशन व्हॅनला पाचारण करण्यात आले होते. तर पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला असुन एटीएम मशिनमध्ये रोकड किती होती ? हे स्पष्ट झाले नाही.

 

 

वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका लगतच जय सोमनाथ हॉटेल आहे याच्या शेजारी इंडियन नं. १ या कंपनीचे खाजगी एटीएम मशीन बसवलेली आहे. या मशिनमध्ये कालच कॅशचा भरणा केलेला होता असं बोललं जात आहे. मध्यरात्री २.५० मि. ते २.५७ मिनिटाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरील मशिनला साखळीच्या सहाय्याने गाडीला बांधून बाहेर काढत मशिन गाडीत टाकून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. वडवणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टेशन व्हॅन बोलावून प्रिंगर घेण्यात आले आहे. तर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलीसांकडून घटनेचा पंचनामा केला असून एटीएम मालकाला देखील भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधाला असल्याचे सांगण्यात आले. सदरील एटीएम कंपनीकडून रेकॉर्ड मागविले जाईल यानंतर रोकड किती होती हे समजणार आहे. पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.

 

    

Advertisement

Advertisement