Advertisement

जयदत्त क्षीरसागरांना विधानपरिषदेवर घेण्याची शिवसैनिकांची मागणी

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

    माजलगाव :  होऊ घातलेल्या विधानपरिषदे च्या नऊ जागांच्या निवडणुकीत  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवड करावी असे पत्रक शिवसेना माजलगाव शहर प्रमुख धनंजय  सोळंके यांनी काढले आहे.
      पत्रकात पुढे म्हटले आहे   की बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भविष्यमध्ये शिवसेनेला अधिक बळकटी मिळवायची असेल तर जयदत्त क्षीरसागर  यांची विधानपरिषदे वर निवड करावी. जयदत्त क्षीरसागर यांचा आजपर्यंतच्या कार्यकाळातला अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरेल, भविष्यातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ मिळेल व जिल्ह्यामध्ये नगर पालिका असेल किंवा जिल्हापरिषद , पंचयातसमिती ,  किंवा ग्रामपंचायत असो सर्व निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना ताकद देण्याचे सामर्थ्य  जयदत्तक्षीरसागर यांच्यामध्ये आहे.   मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच ईमेल द्वारे विधानपरिषदेवर  जयदत्त क्षीरसागर  यांची नियुक्ती करावी असे निवेदन करण्यात येणार असल्याचे शिवसेना माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांनी म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement