Advertisement

भारतीय सैन्य दलात असलेला केज तालुक्यातील जवान शहिद

प्रजापत्र | Tuesday, 27/06/2023
बातमी शेअर करा

केज - तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना  सुरत गड येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. ते 25 मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सेवारत होते.

           अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. तर केवळ सहा महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश चे पार्थिव घेऊन आज रात्री 11 नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्यानंतर ते 28 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांच्या मूळ गावी कोल्हेवाडी येथे पोहोंचनार आहेत. प्रशासनाला अत्यावश्यक सर्व सूचना दिल्या आहेत. सकाळी आठ नंतर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.
            शहीद सुपुत्रास अंतिम निरोप देण्यासाठी केज तालुका व परिसरातील सर्व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष अजिमोद्दीन शेख, सचिव हनुमंत भोसले व सर्व माजी सैनिकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement