Advertisement

दहा हजारांची लाच स्वीकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

प्रजापत्र | Tuesday, 20/06/2023
बातमी शेअर करा

वडवणी - एनसी निकाली काढण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वडवणी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला धाराशिव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका शिक्षकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई आज मंगळवारी दुपारी दिड वाजताच्या सुमारास करण्यात आली. रेवणनाथ गंगावणे असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

तक्रारदार शिक्षकाच्या भावाचा शेजाऱ्यासोबत शेतजमिनीचा वाद होता. त्यातून शेजाऱ्याने शिक्षकावर देखील अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी गंगावणे याने ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर १० हजारांची रक्कम स्वीकारताना रेवणनाथ गंगावणे यास धाराशीव एसीबीचे उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह पथकाने रंगेहाथ पकडले.

 

Advertisement

Advertisement