Advertisement

धारूर आगाराच्या वाहक तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 16/06/2023
बातमी शेअर करा

केज - एसटी आगारातील तरूण वाहकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. महादेव ज्ञानोबा धस असे मयत तरुणाचे नाव असून धारूर आगारात ते वाहक म्हणून कार्यरत होते.
              अधिक माहिती अशी की, १५ जून रोजी धारूर एसटी आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस वय ३५ वर्ष रा. सारणी (सांगवी) यांचा सारणी (सांगवी) शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. सदरील घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे.
            महादेव धस यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेचा तपास केज पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement