नांदूर घाट - अहमदनगर येथील विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटात आज पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रहिवासी शैलेश लोंढे या तरुणाचा जागीच मृत्यु झाला.
नगरहून बीडकडे रासायनिक खत घेऊन हा ट्रक येत होता. पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास करंजी घाटादरम्यान माणिक शहा दर्ग्याजवळ असलेल्या वळणावर ताबा सुटला आणि ट्रक 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळला आहे. यात केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रहिवासी शैलेश लोंढे (वय-३३) या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा साथीदार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने नंदुरघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा