Advertisement

मिरचीच्या फडात गांजाची झाडे लागवड करणाऱ्यास घेतले ताब्यात

प्रजापत्र | Thursday, 08/06/2023
बातमी शेअर करा

केज - तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका गावात मिरचीच्या फडामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याची घटना समोर आली असून केजचे एएसपी पंकज कुमावत यांनी स्वतः सदरील ठिकाणी छापा मारून गांजाची झाडे व लागवड करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

 

(दि.७) रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे चिंचपूर येथील सतपाल ग्यानबा घुगे हा आपले स्वतःचे फायद्या करिता विनापरवाना बेकायदेशीर रित्या मिरचीच्या फडात गांजाच्या झाडाची लागवड करून त्याची चोटी विक्री करण्यासाठी त्याची जोपासना करीत आहे. माहिती मिळाल्यावर सदरची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत व पोलीस ठाणे युसुफ वडगाव  येथील सपोनी योगेश उबाळे, पोलीस अधिकारी व अमलदार सह सदर ठिकाणी जाऊन (दि.७) रोजी 4.15 छापा टाकून सदर ठिकाणी सतपाल ग्यानबा घुगे यास ताब्यात घेऊन मिरचीच्या फडाची तपासून पाहणी केली असता  मिरचीच्या फडामधे गांजाची हिरवीगार अंदाजे साडेपाच ते सहा फूट उंचीचे डेरेदार नऊ झाडे मिळून आले.

 

 दरम्यान, पंचा समक्ष सदरची झाडे उपटून त्याचे वजन केले असता एकूण 24 किलो 830 ग्रॅम अंदाजे 124000 किमतीचा माल मिळून आल्याने सतपाल ग्यानबा घुगे याचे विरुद्ध पोलीस ठाणे वडगाव येथे सपोनी योगेश उबाळे यांचे फिर्यादी वरून कलम 20 NDPS  कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement