Advertisement

'त्या ' महिला खेळाडूंशी सरकारने साधायला हवा होता संवाद : खा. मुंडे

प्रजापत्र | Wednesday, 31/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ३१ (प्रतिनिधी ) : देशभर गाजत असलेल्या महिला खेळाडूंच्या (women wrestlers ) लैंगिक शोषणाच्या विषयात भाजपच्या बीडच्या खासदार (BJP MP ) प्रीतम मुंडे यांनी 'या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही , ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता ' अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. बीड येथे मोदी सरकारच्या काळातील कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही भूमिका घेतली . 
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (pritam munde ) यांनी बीड येथे मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामांबद्दल (Modi Goverenment ) माध्यमांशी संवाद साधला . त्यावेळी महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खा. मुंडे यांनी 'केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल  आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही . ते व्हायला हवे होते . त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी ' असे खा. मुंडे म्हणाल्या . एका भाजप खासदारांनी घेतलेली हि स्पष्ट भूमिका या प्रकरणात महत्वाची ठरणार आहे. 
या पत्रकार परिषदेत खा. मुंडे यांनी मोदी सरकारने महिला , शेतकरी आदींच्या सन्मानासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. तिहेरी तलाक, उजवला योजना , बेटी बचाव योजना आदींचा त्यांनी उल्लेख केला . तसेच राम  मंदिराची उभारणी, काश्मीरमधून कलम ३७० हटविणे आदी गोष्टींचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या . 

Advertisement

Advertisement