Advertisement

154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के

प्रजापत्र | Thursday, 25/05/2023
बातमी शेअर करा

वर्षभराचा अभ्यास आणि उराशी उज्वल भवितव्याचं स्वप्न बाळगून जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेनंतर नुकताच राज्याच्या शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण अशा विविध शाखांमधील परीक्षांचे निकाल जाहीर करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आकडेवारीची सविस्तर माहिती देण्यात आली. 

 

एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकूण निकालाची टक्केवारीही जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये राज्याचा यंदाचा निकाल 91.25 टक्के लागल्याचं स्पष्ट झालं. यंदाच्या वर्षी विविध भाषांमधून घेण्यात आलेल्या HSC च्या परीक्षेसाठी एकूण 154 विषयांसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी तब्बल 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. यंदाच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली, तर मुंबईकर विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागला. 

 

 

 शाखेनुसार निकालाची टक्केवारी 

यंदाच्या वर्षी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागांमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये तब्बल 17 महाविद्यालयांतील विज्ञन शाखेचा निकाल शून्य टक्के लागला असला तरीही याच शाखेत 2023 मध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखेनुसार निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- विज्ञान शाखा : 96.09 टक्के, कला शाखा : 84.05 टक्के, वाणिज्य शाखा : 90.42 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम 89.25 टक्के. 

 

 

कुठे पाहाल बारावीचा निकाल? 

बारावीचा निकाल पाहण्यासाठी 

http://hsc.mahresult.org.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in या संकेतस्थळांना भेट द्या.  

Advertisement

Advertisement