Advertisement

INS मोरमुगाओतून अ‍ॅडव्हान्स्ड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

प्रजापत्र | Tuesday, 23/05/2023
बातमी शेअर करा

भारतीय नौदलाच्या आयएनएस मोरमुगाओ या नव्या युद्धनौकेवरून एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे एक प्रगत क्षेपणास्त्र समुद्रावरून अगदी निम्न पातळीवरून उड्डाण करून समुद्रावर तरंगणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. याला सी स्किमिंग म्हणतात. या चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेत कैकपटीने वाढ झाली आहे.

 

यापूर्वी 14 मे रोजी मोरमुगाओवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. क्षेपणास्त्राने थेट टार्गेटचा वेध घेतला. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्यूरोने आयएनएस मोरमुगाओ डिझाईन केली आहे. ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र वाहक युद्धनौका आहे. तिच्यावरून 300 किमी अंतरावरील टार्गेटचा अचूक वेध घेता येतो.

 

सी स्किमिंग म्हणजे काय?

सी स्किमिंग ही उड्डाणाची एक पद्धत आहे. त्यात क्षेपणास्त्र किंवा विमान पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदीवरून उड्डाण करते. साधारणतः 10 फूटांहून कमी उंचीवर. या तंत्रज्ञानाचा वापर लष्करी व नागरी उद्देशांसाठी केला जातो. उदाहरणार्थ, शोध, बचाव व जहाजविरोधी युद्ध. याचा वापर काही विमानांकडून पाण्यात उतरण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठी देखील करतात.

 

गोव्याच्या नावावरून मोरमुगाओ नाव

प्रथम ब्रह्मोस व आता सी स्किमिंग क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर मोरमुगाओ युद्धनौका अधिकच विध्वंसक बनली आहे. या युद्धनौकेला गोव्यातील बंदर शहराचे नाव देण्यात आले आहे. 19 डिसेंबर 2021 रोजी गोव्याच्या स्वातंत्र्याला 60 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी या युद्धनौकेने आपला पहिला प्रवास केला. तिची कमिशनिंग 18 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला झाली होती.

 

या विनाशिकेची लांबी 163 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्याच्यात 7,400 टन डिस्प्लेसमेंट आहे. INS मोरमुगाओ ही भारताची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली युद्धनौका आहे. तथापि, चांगल्या स्टिल्थ वैशिष्ट्यांमुळे त्याचे रडार क्रॉस सेक्शन (RCS) कमी करण्यात आले आहे.

 

मोरमुगाओचा 75% भाग स्वदेशी

मोरमुगाओ ही स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका आहे. तिचा 75% भाग स्वदेशी बनावटीचा आहे. भारतीय नौदलाच्या मते, पी-15 ब्राव्हो प्रकल्पातील हे दुसरे जहाज आहे. P-15B प्रकल्पांतर्गत 4 युद्धनौका तयार केल्या जात आहेत. यापैकी विशाखापट्टणम व मोरमुगाओ भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली आहे. उर्वरित सुरत व इम्फाळ या 2 युद्धनौकाही लवकरच नौदलातसा मील होतील.

 

Advertisement

Advertisement