Advertisement

शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत उद्या परळीत

प्रजापत्र | Friday, 19/05/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.२०) रोजी बीड येथे महाप्रबोधन यात्रेची सांगता होणार आहे.नांदेडहून परळी वैजनाथ येथे त्यांचे आगमन होणार आहे. उद्या ठीक सकाळी ११ वा. छत्रपती संभाजी महाराज चौकापासून शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेही या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

स्वागत रॅलीचे सुरुवात छत्रपती संभाजी महाराज चौक - ईटके कॉर्नर - उड्डाण पूल - सुभाष चौक - राणी लक्षमीबाई टॉवर - नेहरू चौक मार्गे वैद्यनाथ मंदिर परिसरात रॅलीचा समारोप होणार आहे.रॅली नंतर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहेत. दर्शन केल्यानंतर शिवसेना कार्यालयाला भेट देणार आहेत. दुपारी २ वा. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर बीड येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेसाठी रवाना होणार आहेत.खा.राऊत यांच्या स्वागताची परळीत जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभुते यांनी दिली आहे. शिवसैनिकांनी रॅलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement