आष्टी: बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धानोरा गावाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान सकाळपासून हा मृतदेह आढळून आला असला तरी पोलीस अथवा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी अद्याप त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवलेली नाही. पोलिसांनी यासंदर्भात आरोग्य विभागाला कळवले असून आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट सह आल्यानंतरच मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून, आणि साहित्यातून ओळख पटवण्यासंदर्भात काही कागदपत्रे मिळतात का हे कळणार आहे. तसेच त्यानंतरच सदर व्यक्तीच्या मृत्यूबाबत काही माहिती समोर येईल.
बातमी शेअर करा
Leave a comment