Advertisement

कार-दुचाकीचा अपघात

प्रजापत्र | Tuesday, 16/05/2023
बातमी शेअर करा

केज - शहराकडे येत असलेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारची धडक लागून घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास अंबाजोगाई रस्त्यावरील भारत पेट्रोल पंप जवळ घडली.

महादेव हनुमंत पांचाळ (वय-६०) रा.ढाकेफळ (ता.केज) असे मयताचे नाव असून ते अंबाजोगाई-केज रस्त्याने दुचाकीवरून केजच्या दिशेने येत होते. दरम्यान ते पिसेगाव पाटी पेट्रोल पंपाजवळ आले असता यावेळी पाटी मागून आलेली कार (एम.एच. २५ ए ३१९६) ची दुचाकीला धडक बसली. धडकेत महादेव पांचाळ यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा या महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे. सततच अपघाताच्या घटना घडत आहेत. यामगे वाहतूक नियमांची पायमल्ली हे कारण आहे की, रस्ते असदोष आहेत. यावर मंथन होऊन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना होणं गरजेचं असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

Advertisement

Advertisement