छ. संभाजीनगर - पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करावे आणि पुस्तकातच वहीचे पान असावे अशा निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठीच सहा पुस्तकांची चार भागात विभागणी करण्यात आली असून, वर्गानुसार एकाच पुस्तकात चार ते पाच विषय समाविष्ट करण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची संभाव्य पाठदुखी टळणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडे शिक्षण विभागाकडून पाठयपुस्तकांची मागणी करण्यात येते. विद्यार्थी संख्येनुसार बालभारतीकडे पुस्तकांची मागणी करुन प्रत्येक तालुकानिहाय शिक्षण विभागांतर्गत पुस्तके पुरवली जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक धड्याच्या मागे एक वहीचे पान " माझी नोंद ' या नावाने देण्यात आले आहे. तर रोज विद्यार्थ्यांनी सर्वच पुस्तके दप्तरात न आणता एकाच पुस्तकात चार ते पाच विषयांचा समावेश करण्यात आला आहे. अशी सहा पुस्तकांची चार भागात विभागणी करण्यात आली आहे. अशी माहिती बालभारतीतील अधिकाऱ्यांनी दिली.
यामुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळणाला आहे. एखादे पुस्तक घरी राहिले किंवा विसरलो असा प्रकारही होणार नाही. दिवाळीपूर्वी दोन आणि दिवाळी सुटीनंतर दोन अशा पद्धतीने पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना हाताळता येणार असून, दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
पहिली ते चौथीसाठी ३० लाख ८० हजार तर सहावी ते आठवीसाठी साधारणपणे २६ लाख ६० हजार पुस्तकांची शिक्षण विभागाकडून मागणी केली गेली. यात आणखी विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सध्या शिक्षण विभागातील आकडेवारी नुसार पहिली ते दहावीमध्ये ९ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संख्येत संच मान्यतेनंतर वाढ होण्याची शक्यता आहे. पाठ्यपुस्तकातील या प्रश्नांशिवाय सराव, वर्गपाठ, गृहपाठ यांच्यासाठी स्वतंत्र ठेवण्याची मुभा देखील असणार आहे. काही पाठ्यपुस्तकांमधील पाठांच्या आवश्यकतेनुसार सरावाच्या पानांची संख्या बदलली जाणार आहे. तसचे विद्यार्थी सिसपेन्सीलचाही सरावासाठी वापर करु शकतील. जेने करुन पुन्हा त्या वहिन्याच्या पानाचा उपयोग करता येईल.