Advertisement

बेकायदेशीर रित्या शस्त्र विकणारे पोलिसांच्या ताब्यात

प्रजापत्र | Wednesday, 03/05/2023
बातमी शेअर करा

केज - एएसपी पंकज कुमावत यांचा कारवायांचा धडाका सुरूच असून तालुक्यातील नांदूर घाट येथे मोठी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.०२) रोजी अवैध धंद्यावर रेड करण्यासाठी फौजफाटा गेला होता. यावेळी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अजय त्रिमुखे व ओम गोंद्रे दोन्ही राहणार नांदूर घाट यांनी  विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्यासाठी तलवारी आणले आहेत. तर अजय त्रिमूखे हा मच्छी बाजार नांदूर घाट येते आहे. अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती  सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज  कुमावत यांना कळून त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन अजय त्रिमुके यास ताब्यात घेत त्याचे ताब्यातून 6500 रुपयांच्या दोन तलवारी जप्त करून अजय  तुकाराम त्रिमुखे, ओम गोंद्रे दोन्ही राहणार नांदुर घाट यांचे विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे केज येथे कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement