Advertisement

माजलगाव धरण परिसरातील हातभट्टी अड्डे उध्वस्त

प्रजापत्र | Tuesday, 25/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - येथील धरणाच्या परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेले गावठी हातभट्टीचे अड्डे शहर पोलिसांनी उध्वस्त केले असल्याने गावठी दारूवाल्यांचे धाबे दणाणले आहेत तर या अड्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सांगीतले आहे. 
    शहरासह ग्रामीण भागात हातभट्टी दारू अड्डे आहेत. याबाबत शहर पोलिसांना खब-यांमार्फत धरण परिसरात अड्डे असल्याची माहिती मिळाली होती. या दारूमुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक व्यसनाधिन झाले आहेत तर अनेकांचे संसार देखिल उघड्यावर आले आहेत. दारू पिउन धिंगाणा घालणे, मुलां - बाळांना मारहाण या घटना रोजच होत आहे तर अनेक युवक दारू पिउन दुचाकी चालवितांना आपघात होतात तरी देखिल दारू पिणे सोडत नाहीत. याउलट दारूसाठी मारहाण करणे, भांडण करतात. त्यामुळे शहर पोलिसांनी या हातभट्टी अड्यांवर कारवाइ करत हे अड्डे उध्वस्त केले आहेत. ही कारवाई मंगळवारी दि. 25 एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संदिप मोरे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल कदम यांनी केली आहे. या कारवाईने गावठी दारूवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Advertisement