केज - अंशकालीन कर्मचार्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नसल्याने कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तर केज येथे उमरी रस्त्यासाठी केज विकास संघर्ष समितीने नगरपांचायत कार्यालयासमोर आंदोलन केले.
अंशकालीन कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कर्मचार्यांच्या मागण्या राज्य सरकारने मंजूर कराव्यात, अशी सतत मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने केली जाते. मात्र शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तर केज नगरपंचायत कार्यालयासमोर केज विकास संघर्ष समितीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. उमरी रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष समितीची असून रस्त्याअभावी नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे आंदोलन हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.