Advertisement

बहिनीच्या लग्नासाठी आलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 21/04/2023
बातमी शेअर करा

बीड -  चुलत बहिनीच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या एका 22 वर्षीय नवविवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 20 एप्रिल रोजी आबेगाव ता. माजलगाव येथे घडली.

पुनम बाळासाहेब शिंदे (वय 22 वर्षे, रा. बलभीम नगर, बीड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. जानेवारी महिन्यात पुनमचा विवाह झाला होता. पुनमच्या चुलत बहिनेचे लग्न येत्या काही दिवसात आहे. त्यासाठी पुनम माहेरी आबेगाव ता. माजलगाव येथे गेली होती. तीने 20 एप्रिल रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजूशकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी डॉ. धिरजकुमार, सपोनि खटकळ, सपोनि जोनवाल यांनी भेट दिली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि बोडखे हे करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement