Advertisement

आ.सोळंकेंवर मोहन जगताप, नाईकनवरेंचा हल्लाबोल

प्रजापत्र | Friday, 21/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव-येथील बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडू लागल्या आहेत. मोहन जगताप यांनी आ.सोळंकेनी स्वतः च्या पुत्रासाठी सामान्य कार्यकर्त्याचा बळी दिल्याचा आरोप केला तर नितीन नाईकनवरे यांनी तुमच्या घरातील कुत्रे – मांजराला आता फक्त पदे द्यायची बाकी राहिल्याचा आरोप करत हल्लाबोल केला.

 

उन्हाळ्याच्या तापमान जसे वाढले आहे तसे आत्ता माजलगाव बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने तापमान वाढू लागले आहे. काल गुरुवारी आ.प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन जगताप, नाईकनवरे यांच्यावर आरोप केले होते. त्यास प्रतिउत्तर म्हणून आज (दि.२१) शुक्रवारी भाजप कार्यालय ( मोहनदादा जगताप जनसंपर्क) येथे दुपारी १२ वाजता भाजपा नेते मोहन जगताप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नितीन नाईकनवरे, श्रीकृष्ण सोळंके, संतोष यादव, भास्कर कचरे, राहुल जगताप, जगदीश बादाडे, नितीन काळे आदी उपस्थित होते.

 

मोहन जगताप म्हणाले, आ.प्रकाश सोळंके हिंमत असेल तर मैदानात या म्हणू लागले,हो आत्ता आलोत मैदानात. माझ्या कुटुंबातील यात कुणी उमेदवार नाही, माझ्या जीवा भावाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी मी लढत आहे. परंतू सोळंके स्वतः च्या मुलाला सभापती करण्यासाठी उठाठेव करत आहेत. सोसायटी, ग्रामपंचायत निवडणूक न लढता, सामान्य कार्यकर्त्याच्या मानगुटीवर पाय देऊन राजीनामा देण्यास भाग पाडून स्वतः च्या मुलाला सदस्य केले. त्यातून निवडणूक लढवत सभापती होण्याची आशा बाळगत आहेत. त्यांनी यापुढे चुकीचे आरोप करू नये, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जगताप यांनी दिला.

Advertisement

Advertisement