Advertisement

लग्नात काहीच दिले नाही म्हणून एका पत्नीची पतीकडून हत्या

प्रजापत्र | Friday, 21/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - येथील शहर पोलीस हद्दीतील भाटवडगाव परिसरातील पतीने पत्नीला धारदार हत्याराने शरीरावर वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे

 

भाटवडगाव येथील आरोपी पती अनंत भागवत सुगडे रा.भाटवडगाव वय ३८ वर्ष याने मयत प्रतिभा अनंत सुगडे रा.भाटवडगाव वय २९ वर्ष हिला तुझ्या घरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही म्हणून गेल्या अनेक दिवसापासून शारीरिक व मानसिक त्रास देत काल दि.२०/०४/२०२३ रोजी आरोपी पतीने पत्नीस मारहाण करून धारदार शस्त्राने शरीरावर वार केले त्यात तीला माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले अधिक उपचाराकरिता बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले असता उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

 

याबद्दल पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार मयत महिलेचा भाऊ प्रथमेश प्रकाश पंडित रा.जामखेड जि.अहमदनगर यांच्या फिर्यादी वरून आरोपी अनंत भागवत सुगडे विरुद्ध १३३/२०२३ कलम ३०२,४९८ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पी.एस.आय.दाभाडे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement