Advertisement

”त्या” अपघातातील मृतांची ओळख पटली

प्रजापत्र | Thursday, 20/04/2023
बातमी शेअर करा

केज दि.२० – बुधवारी सायंकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान केज बीड रोडवरील सांगवी पाटी जवळ ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये दुचाकी वरील दोघे जागीच ठार झाले. मात्र अपघात झाला त्यावेळेस सदरील व्यक्तींची ओळख पटलेली नव्हती. परंतु पोलीस तपासामध्ये त्यांची नावे समोर आलेले आहेत.

 

 

            विकास हरिभाऊ पवार वय 27 वर्षे आणि विजय संभाजी आव्हाड वय 37 वर्षे राहणार सावरगाव (बौद्ध विहार) कळंब हे दोघे आपल्या दुचाकीवरून दहिफळ वडमाऊली ची यात्रा करून केज कडे निघाले होते. दरम्यान त्यांची दुचाकी केज बीड रोडवरील सांगवी पाटीजवळ आले असता आंबेजोगाईहून रायगडकडे चाललेल्या ट्रॅव्हलची धडक झाली आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. आंबेजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूलची सहल ही रायगडला चालली होती. त्यामध्ये बरेच विद्यार्थी होते मात्र सुदैवाने ट्रॅव्हल्समधील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही.

 

 

             सदरील अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक दिलीप गीते यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली.

Advertisement

Advertisement