Advertisement

१४ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 18/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव, दि.१८: तालुक्यातील नित्रुड येथील १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाब मोहंमद मुर्तुजा शेख असे नाव आहे. याबाबत मात्र नातेवाईकाने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुस्लिम समाजाचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे रमजान महिना त्यात घरातील तरुण मुलगा रोजा असताना आत्महत्या करतो ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबद्दल अधिक माहितीअशी की माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील वेदांत बिअरबार च्या पाठीमागील शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गुलाब मोहंमद मुर्तूजा शेखचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (मंगळवारी) सकाळी ९ वाजण्याच्या आढळला. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिंद्रुड पोलिसांना कळवली. यावर गुलाब चा मृतदेह हा माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता आणण्यात आले आहे. गुलाब हा रोजा (उपवासात) होता. तसेच त्याने आत्महत्या केलेली नसून तो घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement