Advertisement

वैद्यनाथ साखर कारखान्यावर छापा !

प्रजापत्र | Thursday, 13/04/2023
बातमी शेअर करा

परळी- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा घातल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंडे या भाजपच्या माजीमंत्री आहेत,असे असताना त्यांच्याच कारखान्यावर छापा घातला गेल्याने खळबळ उडाली आहे.

 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी वीस बावीस वर्षांपूर्वी पांगरी येथे वैद्यनाथ साखर कारखाना सुरू केला.त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली.वेगवेगळ्या कारणांमुळे हा कारखाना अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.दरम्यान गुरुवारी सकाळीच कारखान्यावर जीएसटी विभागाचे अधिकारी दाखल झाले.कारखान्याने जीएसटी चुकवल्याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी एक पथक कारखान्यावर दाखल झाले असून तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement