Advertisement

वाळु तस्करांना दणका

प्रजापत्र | Tuesday, 11/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - IPS डॉ धीरज कुमार यांच्या पथकांच्या कारवाईने अवैध्य व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सोमवारी गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवेद्य वाळू उपसा करत असलेल्या दहा केन्या, ८ ट्रॅक्टर व एक हजार ते आकराशे ब्रास वाळू जप्त करण्याची कारवाई केली. यामुळे गेवराई तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

 

पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड, सहायक पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माजलगाव येथील पथकाने सोमवार (दि.१०) रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन गेवराई मध्ये खामगाव- सावरगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रात काही इसम ट्रॅक्टर हेडला केनी जोडून नदी पात्रातील पाण्यातुन अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती मिळाली. यावरून IPS डॉ.धीरज कुमार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, पोलीस हवालदार अतिषकुमार देशमुख, पोलीस नाईक अशोक नामदास, पोलीस कॉन्स्टेबल गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे यांनी गोदावरी नदी पात्रातील ८ ट्रॅक्टर, १० केन्या, अंदाजे १००० ते ११०० ब्रास अवैधरित्या उपसा केलेल्या वाळु छापा मारून जप्त केल्याची कारवाई केली आहे. मात्र यावेळी नदीपात्रातील सर्व इसम ट्रॅक्टर, केन्या इतर साहीत्य जागीच टाकुन पसार झाले. जप्त केलेले ८ ट्रॅक्टर आणि १० केन्या पोलीस कारवाईमध्ये पोलीस स्टेशन गेवराई येथे जमा केलेल्या विरुध्द महसुल प्रशासन मार्फतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिलेला आहे.

Advertisement

Advertisement