दिंद्रुड - एका खासगी ट्रॅव्हल्सचे अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या खाली खड्ड्यात गेल्याची घटना रात्री १२च्या सुमारास माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडजवळ घडली.
नांदेड येथील एक खाजगी ट्रॅव्हल्स (एम.एच.०९ सिव्ही ०७३६) पुणे येथे 30 प्रवासी घेऊन निघाली होती. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडजवळ बीड - परळी हायवे वर एका पुलाच्या शेजारी तिचा स्टेअरिंग रॉड तुटला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीवर कसाबसा ताबा मिळवत ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली.
यावेळी काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. शेख रहमान गाडी मालकाचे नाव असल्याची माहिती चालकाकडून मिळाली.यावेळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. गाडीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून आले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
बातमी शेअर करा