Advertisement

चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - तालुक्यातील रिधोरी येथून दिवसा ढवळ्या वाळू चोरी करत असल्याची माहिती आयपीएस डॉ.बी. धीरज कुमार यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार आज (दि.०५) रोजी वाळू चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याची कारवाई करण्यात आली.

माजलगाव तालुक्यातील रिधोरी येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध्य वाळू वाहतूक होत असल्याची माहिती IPS डॉ.बी.धीरज कुमार यांच्या पथकाला गुप्त बातमीदारकडून बुधवारी मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने आज (दि.०५) दुपारी ३.३० वाजता वाळू चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर पकडले. दोन्ही ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी तहसिल कार्यालय माजलगावकडे वर्ग करण्यात आले आहेत.
सदर कारवाई ही IPS डॉ.बी.धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस नाईक अशोक नामदास, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, संतराम थापडे, युवराज चव्हाण यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement