Advertisement

११ वर्षाच्या मुलाने बनविले जबरदस्त AI ॲप,

प्रजापत्र | Wednesday, 29/03/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्लीः केरळच्या एका ११ वर्षीय मुलीने ६ महिन्याच्या रिसर्चनंतर 'Ogler EyeScan' डेव्हलेप केले आहे. या मुलीचे नाव लीना रफिक (Leena Rafeeq) असे आहे. लीनाने आयफोनच्या मदतीने स्केनिंग प्रोसेसवर काम केले आहे. हे AI बेस्ड ॲप आहे. यामुळे आता डोळ्याच्या आजाराची माहिती ७० टक्के ओळखता येऊ शकणार आहे. लीनाने सांगितले की, ॲपल स्टोर 'Ogler EyeScan' ला रिव्ह्यू करीत आहे. लवकरच याला परवानगी मिळू शकते.

 

 

सोशल मीडियावर या ॲपची वर्किंग पाहून व्हिडिओ शेअर केला जात आहे. ज्यात Ogler EyeScan ॲपने आर्कस, मेलेनोमा, टेलिजियम आणि मोतीबिंदूची माहिती कळू शकणार आहे. लीनाने दावा केला आहे की, हे ॲप अडवॉन्स्ड कम्प्यूटर आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लाइट आणि कलर इंटेंसिटी, डिस्टेंस, फ्रेम रेंजच्या आत लूक अप पॉइंट्स द्वारे माहिती करण्यात सक्षम आहे.

 

 

लीनाने सांगितले की, हे ॲप पूर्ण पणे स्वदेशी आहे. यात SwiftUI द्वारे बनवले आहे. या ॲपला बनवण्यासाठी डोळ्याची कंडिशन्स, कंम्प्यूटर व्हिजन, अल्गोरिदम, मशीन लर्निंग मॉडल्स, अॅपलचे अडवॉन्स्ड iOS डेवलपमेंट्स जसे, सेन्सर डेटा , AR, CreateML, CoreML विषया संबंधी ६ महिन्यांपर्यंत याची माहिती जमवली व नंतर त्यात संशोधन केले आहे, असे लीनाने सांगितले आहे. लीनाची मोठी बहीण हाना, सोशल मीडियावर अवघ्या ९ व्या वर्षी एक स्टोरी टेलिंग ॲप बनवून सर्वात तरुण iOS डेवलपर साठी व्हायरल झाली होती.

 

 

अनेकांकडून अभिनंदन
लीना रफिकने आयफोनचा वापर करून एक जबरदस्त स्कॅनिंग ॲप तयार केले आहे. यामुळे डोळ्याच्या आजाराची माहिती समजू शकणार आहे. अनेक यूजर्संनी या नवीन कामगिरीसाठी लीनाचे अभिनंदन केले आहे. कमी वयात अशी कामगिरी केल्याने लीनाचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement