Advertisement

एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाचीच चौकशी व्हायला पाहिजे

प्रजापत्र | Wednesday, 29/03/2023
बातमी शेअर करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेद पदवी प्रदान केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी डॉक्टर झालेल्या एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे.आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळवतात येते. अशा पद्धतीने भ्रष्टाचाऱ्यांना डॉक्टरे देणाऱ्या विद्यापीठांचीच चौकशी व्हायला पाहीजे. अशा पद्धतीने डॉक्टरेट मिळवणारे लोक पायलीला पन्नास मिळतील. एकनाथ शिंदेंना डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची अशी कोणती काम अडकली होती? अशा कोणत्या फायली अडकल्या होत्या त्यामुळे त्यांना असे काम करावे लागले.

 

 

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आता डॉक्टर झाले आहेत. त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की वीर सावरकर कोणत्या बोटेतून उडी मारून कोणत्या बेटावर गेले? आम्हाला चांगला मुका मार देता येतो. आता तुम्ही डॉक्टर झाले आहात तर स्वत:वर ऑपरेशन करत रहा.

 

 

भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे. विरोधकांच्या आंदोलनालाही भाजपकडून आडकाठी घातली जात आहे. या देशातील जनता आता भाजपविरोधात रस्त्यावर उतरत आहे. याचाच अर्थ जनतेच्या मनात भाजपविरोधात रोष आहे. या लोकांनी भाजपला मतदान केलेले नाही. भाजपने भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकलेली आहे. शरद पवारांनी ईव्हीएमचा मुद्दा पुढे आणला आहे. या विषयावर पुढे जाण्याची गरज आहे.
 

Advertisement

Advertisement